आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघातर्फे आयोजित चॅम्पियन्स चॅलेंज स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली. २७ एप्रिल ते ४ मे या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.
नवनीत कौर आणि नेहा गोयल या दोघींना पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळाले आहे. रितू राणीकडे संघाचे नेतृत्व असणार आहे तर चंचनदेवी उपकर्णधार असणार आहे. स्पर्धेत भारताच्या गटात कोरिया, बेल्जियम आणि यजमान स्कॉटलंड आहे. भारतीय संघाची सलामीची लढत २७ एप्रिलला कोरियाविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ आर्यलडविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळणार
आहे.
भारतीय महिला संघ : गोलरक्षक : योगिता बाली, सविता, बचावपटू : दीप ग्रेस इक्का, दीपिका, सुनीता लाक्रा, किरणदीप कौर, नमिता टोप्पो, मोनिका मलीक. मध्यरक्षक : सुशीला चानू, रितु राणी, लिली चानू, चंचन देवी, सौंदर्या येंडला. आघाडीपटू : अनुराधा देवी, पूनम राणी, वंदना कटारिया, नवनीत कौर, नेहा गोयल.