एकीकडे आयपीएलची धूम चालू असली तरी मतदानाचा हक्क बजावण्याचा निर्णय किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने अमलात आणून दाखवून दिला. २८ एप्रिलला पंजाबचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना संपल्यावर पुजारा मतदानासाठी भारतात येण्यासाठी निघाला आणि त्याने बुधवारी येथे मतदान केले. ‘‘नवीन सरकारसाठी मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. युवा किंवा जेष्ठ नागरिक कुणीही असो त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावायला हवा,’’ असे पुजाराने मतदानानंतर पत्रकारांना सांगितले.