भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन याचा आज ३१ वा वाढदिवस असून भारतीय क्रिकेटपटूंनी ‘बर्थडे बॉय’वर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शिखर धवन सध्या भारतीय संघाचा भाग नसला तरी धवनने भारताकडून खेळताना काही महत्त्वपूर्ण आणि अविस्मरणीय खेळी साकारल्या आहेत. भारतीय संघातील ‘गब्बर’ अशी ओळख असलेल्या शिखर धवन या डावखुऱया सलामीवीर फलंदाजाला भारताच्या अनेक क्रिकेटपटूंनी ट्विटरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

वाचा: ‘हॅपी बर्थडे’ शिखर धवन: टीम इंडियाच्या ‘गब्बर’ला ‘वीरु’च्या हटके शुभेच्छा

माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने आपल्या हटके अंदाजात शिखरला शुभेच्छा दिल्या, तर सुरेश रैना, गौतम गंभीर, इरफान पठाण यांनी आगामी वर्ष खूप भरभराटीचे जावो, असे म्हणत शिखरला शुभेच्छा दिल्या.

वाचा: खुशखबर.. लोकेश राहुल फीट; वानखेडे कसोटीत येणार सलामीला

शिखरने २००४ साली प्रथम श्रेणी क्रिकेटमधून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. २०१३ साली मोहालीत धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली १८७ धावांची खेळी अविस्मरणीय ठरली. धवनच्या त्या बिनधास्त खेळीने सर्वांचे मन जिंकले होते. गेल्या काही महिन्यांपासून दुखापतींशी सामना करावा लागत असला तरी क्रिकेटप्रतीची तो खूप प्रामाणिक राहिला आहे.