प्रशिक्षक सागर बांदेकर यांना विश्वास

प्रो कबड्डी लीगच्या मागील हंगामात दबंग दिल्लीला विजयासाठी झगडायला लागले होते. पण ताज्या लिलावामध्ये काशिलिंग आडके, बी. सुरेश, सचिन शिंगार्डे, अनिल कुमार, मेराज शेख, दीपक नरवाल, प्रशांत राय, प्रशांत चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीचा संघ यंदा विजेतेपदाला गवसणी घालू शकतो, असा विश्वास दबंग दिल्लीचे नवनिर्वाचित प्रशिक्षक सागर बांदेकर यांनी व्यक्त केला. मागील हंगामातील १४ सामन्यांपैकी एकमेव सामना दिल्लीला जिंकता आला होता, तर एक सामना बरोबरीत सोडवला होता.

Arvind Kejriwal aap Rajkumar Anand resigns
अरविंद केजरीवालांना मोठा धक्का, दिल्लीतल्या मंत्र्याचा राजीनामा, आम आदमी पार्टीवर गंभीर आरोप करत म्हणाले…
Ruturaj Gaikwad has been fantastic as CSK captain so far says Hussey
IPL 2024 : गावस्कर यांच्यापाठोपाठ आता चेन्नईचे प्रशिक्षक हसीदेखील प्रभावित; ऋतुराज गायकवाड क्रिकेट जाणणारा माणूस
IPL 2024 Rohit Sharma back as captain Mumbai's
IPL 2024: रोहित शर्माला पुन्हा मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद मिळेल का? माजी दिग्गजाचे मोठे विधान
‘त्या’ पोस्टवरून काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांना भाजपाने घेरले, काय म्हणाले खासदार मनोज तिवारी?

‘‘काशिलिंग अतिशय फॉर्मात आहे. माझ्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचा त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. पण काशिलिंग म्हणजे दिल्ली असे समीकरण यंदा दिसणार नाही. काशिलिंगला साथ देणारे आणखी काही खेळाडू आता संघात असल्यामुळे फक्त त्याच्या कामगिरीवरच दिल्ली अवलंबून नसेल. संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे, त्यामुळे आमची कामगिरी नक्कीच चांगली होईल,’’ असे बांदेकर यांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या दिल्लीचा नवी मुंबईत सराव सुरू आहे.

मुंबईच्या प्रारंभीच्या टप्प्यात २७ जूनला बंगाल वॉरियर्स आणि २८ जूनला पुणेरी पलटणशी त्यांचे सामने होणार आहेत. यासंदर्भात बांदेकर म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील सामन्यांचा आम्हाला फायदा घेता येईल. कारण कबड्डीरसिकांना काशिलिंगचा खेळ माहिती आहे. याशिवाय आणखीसुद्धा महाराष्ट्राचे काही खेळाडू आमच्या संघात आहेत. त्यामुळे मुंबईतसुद्धा दिल्लीचा खेळ बहरेल.’’