01 July 2016

News Flash

बेकहॅम संपूर्ण मानधन स्वयंसेवी संस्थेला देणार!

इंग्लंडचा महान फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम पाच महिन्यांसाठी पॅरिस सेंट जर्मेन क्लबशी करारबद्ध झाला असून

एपी, पॅरिस | February 1, 2013 5:24 AM

इंग्लंडचा महान फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम पाच महिन्यांसाठी पॅरिस सेंट जर्मेन क्लबशी करारबद्ध झाला असून तो आपले संपूर्ण मानधन लहान मुलांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेला सुपूर्द करणार आहे. अनेक क्लबचे प्रस्ताव धुडकावून लावत बेकहॅमने पॅरिस सेंट जर्मेनसाठी फुकटात खेळण्याचे ठरवले आहे. मात्र मानधनाची रक्कम आणि स्वयंसेवी संस्थेचे नाव उघड करण्यास बेकहॅमने नकार दिला. ‘‘३७व्या वर्षांतही अनेक क्लबचे प्रस्ताव माझ्यासमोर होते, ही आनंदाची बाब म्हणावी लागेल. ज्या क्लबतर्फे मी खेळलो, त्या क्लबला मी यशाच्या शिखरावर आणून ठेवले. ’’

First Published on February 1, 2013 5:24 am

Web Title: david beckham joins paris saint germain will donate salary to charity