ठाण्यातील उपवन परिसरात ‘निळकंठ हाईट’ या इमारतीच्या २१ व्या मजल्यावरून पडून एका वृद्धाचा मृत्यू झाला. फिरोज मेहता (वय ८४) असे मृत पावलेल्या वृद्धाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

‘निळकंठ हाईट’ इमारतीच्या २१ व्या मजल्यावर मेहता यांचा स्वत:चा फ्लॅट होता. यात ते एकटेच राहत होते. त्यांनी आत्महत्या केली की, हत्या याबाबत कोणतीही माहिती अद्याप समजू शकले नाही. वर्तकनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. वयोवृद्धाची आत्महत्या आहे की, हत्या याचा पोलीस तपास करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.