परदेशातील पराभवांमुळे महेंद्रसिंग धोनीवर टीका होत असली तरी त्याची कामगिरी दमदार होती, असे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने व्यक्त केले आहे. ‘‘भारताचे कर्णधारपद हा काटेरी मुकुट असतो. त्याच्यावर जबरदस्त दडपण असते, त्याचबरोबर त्याच्याकडून जास्त अपेक्षा असतात. हे सर्व सांभाळून धोनीने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. माझ्या मते भारतासाठी धोनीची कसोटी क्रिकेटमधून जागा भरून काढणे कठीण आहे,’’ असे क्लार्क म्हणाला.