‘फोर्ब्स’ मासिकाने जाहीर केलेल्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या जगातील शंभर क्रीडापटूंच्या यादीत भारताच्या फक्त महेंद्रसिंग धोनीने स्थान मिळवले आहे. या यादीत अमेरिकेचा बॉक्सिंगपटू फ्लॉइड मेवेदर अव्वल स्थानावर आहे. याशिवाय गोल्फपटू टायगर वूड्स, टेनिसपटू रॉजर फेडरर आणि पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी स्थान मिळवले आहे.
‘फोर्ब्स’ने जाहीर केलेल्या २०१५सालच्या जागतिक यादीत धोनी २३व्या स्थानावर आहे. गतवर्षी तो २२व्या स्थानावर होता. धोनीची एकंदर कमाई तीन कोटी आणि दहा लाख डॉलर्स इतकी आहे. ३३ वर्षीय धोनीने २०१४मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. परंतु एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व सांभाळत आहे.
‘फोर्ब्स’च्या यादीत मेवेदर अव्वल
खेळाडू कमाई
१. फ्लॉइड मेवेदर ३० कोटी डॉलर्स
२. मॅनी पॅक्युआओ १६ कोटी डॉलर्स
३. ख्रिस्तियानो रोनाल्डो ७ कोटी ९६ लाख डॉलर्स
४. लिओनेल मेस्सी ७ कोटी ३८ लाख डॉलर्स
५. रॉजर फेडरर ६ कोटी ७० लाख डॉलर्स