30 May 2016

धोनीने कर्णधारपदावरून विश्रांती घ्यावी – सुनिल गावसकर

भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने कर्णधारपदावरून विश्रांती घेऊन त्याजागी विराट कोहलीची वर्णी लावावी असं

नवी दिल्ली | December 28, 2012 3:48 AM

भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने कर्णधारपदावरून विश्रांती घेऊन त्याजागी विराट कोहलीची वर्णी लावावी असं मत लिटील मास्टर सुनिल गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे. २०१५ सालच्या विश्वचषक स्पर्धेसाठी पुरेसा अवधी असताना आता विश्रांती घेतल्यास त्याला ती नक्कीच उपयोगाची ठरेल, असंही ते पुढे म्हणाले. एखादी मालिका सुरू असताना हा निर्णय न घेता, ऑस्ट्रेलियाविरूध्दची मालिका संपल्यावर अथवा २०१३ वर्षाच्या मध्यंतरी हा निर्णय घेता येऊ शकतो. यावर विचार व्हायला हवा, असं सुनिल गावस्कर म्हणाले.
धोनीच्या अनुपस्थितीत युवा फलंदाज विराट कोहली हा भारताच्या कर्णधारपदासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. त्याला कर्णधारपदाची संधी द्यायला हवी, असंही गावस्कर यांनी नमूद केलं.
मागील काही सामन्यांमध्ये धोनीची वैयक्तीक कामगिरी खराब होत असतानाच संघ म्हणून भारताचीही कामगिरी खराब होताना दिसत आहे. त्यामुळे धोनीवर कर्णधारपदापासून दूर होण्यासाठी दबाव वाढताना दिसत आहे.   

First Published on December 28, 2012 3:48 am

Web Title: dhoni should take a break from captaincy gavaskar