अर्जेटिनाचे महान फुटबॉलपटू हे आपली मैत्रीण रोकिओ ऑलिव्हा हिला मारहाण करत असल्याचा व्हिडीयो प्रसिद्ध झाल्यानंतरही मॅराडोना यांनी ऑलिव्हाविरोधात चोरीची तक्रार दाखल केली आहे. ‘‘हा व्हिडीयो प्रसिद्ध होण्यामागे माझा नव्हे तर मॅराडोनाच्या पुतण्याचा हात आहे. मी अलीकडेच मॅराडोनाशी संपर्क साधला होता, पण त्यांनी माझ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे,’’ असे ऑलिव्हाने सांगितले.