रॉबिन बिश्तच्या अर्धशतकाच्या बळावर मध्य विभागाने दुलीप करंडक क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम फेरीच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण विभागाविरुद्ध सात बाद २३७ धावा केल्या. बिश्तने १५३ चेंडूंत १२ चौकार आणि एका षटकारासह ७९ धावा केल्या. तो शतकाकडे वाटचाल करीत असताना चुकीचा फटका खेळल्यामुळे बाद झाला.
मध्य विभागाकडून तीन महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या झाल्या. परंतु फलंदाज स्थिरावतोय, असे वाटत असतानाच त्यांना धक्के बसले. त्यांचा सलामीवीर फैझ फैझलचे अर्धशतक फक्त एका धावेने हुकले. दक्षिण विभागाकडून बाबा अपराजितने २६ धावांत २ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक
मध्य विभाग (पहिला डाव) : ७ बाद २३७ (रॉबिन बिश्त ७९, फैझ फैझल ४९, अरिंदम घोष खेळत आहे ३२; बाबा अपराजित २/२६).