इंग्लंडच्या संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फुटबॉलपटू वेन रुनीने आंतराष्ट्रीय फुटबॉलमधला आपला प्रवास थांबवायचा ठरवलं आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांना फोनवरुन दिलेल्या मुलाखतीत रुनीने आपण निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. इंग्लंडकडून खेळताना रुनीने ११९ सामन्यांमध्ये ५३ गोल झळकावले आहेत. २००३ साली वयाच्या सतराव्या वर्षी रुनीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून आंतराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण केलं. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये रुनी आपल्या फॉर्ममध्ये नव्हता, त्यामुळे एककाळ इंग्लंडच्या संघाचं नेतृत्व करणाऱ्या खेळाडूला संघ व्यवस्थापनाने डच्चू दिला. यानंतर इंग्लंडच्या संघाचे नवीन मॅनेजर गॅरेथ साऊथगेट यांनी रुनीला संघात जागा देण्यात स्वारस्य दाखवलं नाही. त्यामुळे काळाची पावलं ओळखत रुनीने आंतराष्ट्रीय संघातून राजीनामा देण्याचं पसंत केलं.

“काही दिवसांपूर्वी साऊथगेट यांनी मला फोन करुन संघात पुनरागमन करण्याबद्दल विचारणा केली होती. मात्र मी त्यांचे आभार मानत, राष्ट्रीय संघासाठी पुन्हा खेळण्याला नकार दिला आहे. इंग्लंडच्या संघासाठी माझा प्रवास मी इथेच थांबवत असल्याचं स्पष्टीकरण रुनीने दिलंय.

stock market update sensex drops 454 points nifty settle at 21995 print
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ४५४ अंश घसरण
Ecuadorian police break the Mexican embassy and arrested former vice president of Ecuador Jorge Glas
इक्वेडोरकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन; लॅटिन अमेरिकेतील राष्ट्रे संतापली…
new international cricket stadium in thane marathi news
ठाण्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान? ‘एमसीए’ची एकमेव निविदा दाखल
IPL 2024 The List of Mumbai and Maharashtra Players which team has the most
IPL 2024: यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई-महाराष्ट्राचा टक्का सर्वाधिक, पाहा कोणत्या संघात आहेत सर्वाधिक खेळाडू

“इंग्लंडचं राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणं हे माझ्यासाठी सर्वात महत्वाची आणि मानाची बाब होती. आतापर्यंतच्या कारकिर्दीत मी संघासाठी १०० टक्के खेळ केला. मात्र गेल्या काही सामन्यांमधली माझी कामगिरी पाहता आता मला थांबायला हवं असं वाटल्याने मी स्वखुशीने निवृत्तीचा निर्णय घेतोय.”

सध्या वेन रुनीने त्याच्या लिग फुटबॉल करियरवर लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. गेले काही वर्ष मँचेस्टर युनायडेट क्लबकडून खेळणाऱ्या वेन रुनीने यंदाच्या इंग्लिश प्रिमीअर लिगमध्ये एव्हरटन संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या हंगामात मँचेस्टर सिटी विरुद्ध सामन्यात वेन रुनीने १ गोल झळकावला. हा गोल रुनीच्या क्लब कारकिर्दीतला २०० वा गोल ठरला. इंग्लिश प्रिमीअर लिगच्या कारकिर्दीत २०० गोल करणारा रुनी हा दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम अॅलन शेरर या खेळाडूच्या नावावर आहे.

रुनीच्या निवृत्तीनंतर ट्विटरवर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.