बांग्लादेशच्या दौऱ्यावर सुरक्षेच्या कारणामुळे न जाणाऱ्या इऑन मॉर्गनची भारताविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी कर्णधार म्हणून पुन्हा निवड झाली आहे. इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय टीमला नवसंजीवनी देणारा कर्णधार म्हणून मॉर्गनकडे पाहिले जाते. मागील विश्चचषकावेळी पहिल्याच फेरीतून बाद झाल्यामुळे इंग्लंडवर लाजीरवाणा प्रसंग ओढावला होता. त्यानंतर त्याने इंग्लंडच्या टीमला पुन्हा सावरले.

अॅलेक्स हेल्सने देखील सुरक्षेच्या कारणामुळे बांग्लादेशला जाण्याचे टाळले. बांग्लादेश दौऱ्यासाठी टीमचे नेतृत्व करणारा जॉस बटलर देखील संघात असणार आहे.  हेल्स आणि मॉर्गन दोघांनीही बांग्लादेश दौऱ्याला जाण्याचे टाळले. इंग्लंडचे क्रिकेट नियामक मंडळ द इंग्लिश अॅंड वेल्स क्रिकेट बोर्डाने सुरक्षेची पूर्ण ग्वाही देऊनही हे दोघे संघाबाहेर होते. संघाचे सुरक्षा प्रमुख रेग डिकसन यांनी दौऱ्यापुर्वी बांग्लादेशच्या परिस्थितीची पाहणी केली होती.

कसोटी संघात असणारा जोई रुट हा देखील एक दिवसीय संघात परतणार आहे. काही काळाकरता त्याला एकदिवसीय संघातून विश्रांती देण्यात आली होती. बेन डकेट, स्टीव्हन फिन आणि जेम्स व्हिन्स हे या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत दिसणार नाहीत.इंग्लंड आणि भारतामध्ये तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-२० सामने होणार आहेत.
एकदिवसीय संघ- मोईन अली, जोनाथन बेअरस्टो, जेक बॉल, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, लिएम डॉसन, अॅलेक्स हेल्स, इऑन मॉर्गन (कर्णधार) आदील रशीद, जोई रुट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, लिएम प्लंकेट

टी- २० संघ- मोईन अली, जेक बॉल, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, लिएम डॉसन, अॅलेक्स हेल्स, इऑन मॉर्गन (कर्णधार) आदील रशीद, जोई रुट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, लिएम प्लंकेट, टायमल मिल्स, ख्रिस जॉर्डन