मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- महाराष्ट्राला दुष्काळातून मुक्त करण्यासाठी शासनाने कंबर कसली- पृथ्वीराज चव्हाण
- खुनी नव-यापासून पत्नीने घेतला घटस्फोट
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
- पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे शाळेत पुष्पगुच्छाने स्वागत
- लातूर, औसा, रेणापूरमध्ये काढला ४५ कोटींचा गाळ
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- ययाति आणि देवयानी
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
देशातील सर्वोच्च अशा पद्मभूषण पुरस्कारासाठी माझी शिफारस मला आगामी कारकीर्दीकरिता प्रेरणादायक ठरणार आहे, असे भारताचा ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता मल्ल सुशील कुमार याने सांगितले.
लागोपाठ दोन ऑलिम्पिक स्पर्धामध्ये पदक मिळविणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याची किमया सुशील कुमारने केली आहे. पद्मभूषण पुरस्काराची शिफारस म्हणजे आजपर्यंत मी कुस्ती क्षेत्रात जी मेहनत केली आहे, त्याचेच हे फळ असल्याचे मी मानतो. हा पुरस्कार मिळाल्यावर कुस्ती क्षेत्राचाच गौरव होणार आहे त्यामुळे मी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे आभारच मानणार आहे, असे सुशीलने सांगितले.
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने यंदाच्या पद्मभूषण पुरस्कारासाठी सुशील कुमार व भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांची शिफारस केली आहे. सुशीलला २००९मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार व २०११मध्ये पद्मश्री किताब मिळाला होता. यंदा पद्मश्री किताबाकरिता ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता नेमबाज विजय कुमार, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त यांची शिफारस केली आहे. या दोन्ही खेळाडूंना गतवर्षी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















