संघटनेला लागलेली गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराची वाळवी दूर व्हावी, यासाठी जागतिक फुटबॉलचे नियंत्रण करणाऱ्या फिफामध्ये घाऊक सुधारणा मोहीम हाती घेण्यात येणार आहे. झुरिच येथे आयोजित ‘फिफा’च्या विशेष बैठकीत १७९ संलग्न सदस्यांनी या प्रतिमा सुधारण्याच्या अभियानाला होकार दिला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला मूल्यशिक्षणाचे धडे देणाऱ्या फ्रँकॉइस कारार्ड या स्वित्र्झलडच्या विधितज्ज्ञांनी फिफासाठी अनेक कलमी कार्यक्रम आखला आहे. मुख्य कलमानुसार फिफाचे अध्यक्ष आणि कार्यकारिणी समितीच्या भूमिकेत बदल करण्यात येणार आहे.

एखाद्या बोर्डाच्या कॉर्पोरेट अध्यक्षाप्रमाणे फिफाचा अध्यक्ष काम करेल. त्याच्या अधिकारांमध्ये मोठय़ा प्रमाणावर कपात करण्यात आली आहे. गैरव्यवहाराचे सत्ताकेंद्र ठरलेल्या फिफाच्या कार्यकारिणी समितीचे फिफा परिषद असे नामकरण करण्यात येणार असून, कॉर्पोरेट बोर्ड सदस्यांप्रमाणे त्यांना काम करावे लागेल. पूर्वीच्या संरचनेनुसार सरचिटणीस हे दुसएखाद्या बोर्डाच्या कॉर्पोरेट अध्यक्षाप्रमाणे फिफाचा अध्यक्ष काम करेल.ऱ्या क्रमांकाचे पद होते. आता हीच व्यक्ती फिफाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणार आहे.

  • अध्यक्ष आणि कार्यकारिणी समिती सदस्यांची चार वर्षांच्या कार्यकाळासाठी सलग तीनदाच नियुक्ती होऊ शकते.
  • सरचिटणीसच्या कार्यालयातून विविध निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येईल.
  • फिफा परिषदेत किमान सहा महिलांचा सहभाग अनिवार्य
  • फिफाचे अध्यक्ष, परिषद, महासचिव, स्थायी आणि विधी समितीच्या सदस्यांना आपली मालमत्ता जाहीर करावी लागेल.
  • महिला फुटबॉलला चालना देण्यासाठी प्रत्येक महासंघातर्फे एका महिला प्रतिनिधीची परिषदेसाठी निवड केली जाईल
  • विविध आयोगांची संख्या २६ वरून नऊवर आणण्यात आली आहे.