अमेरिकन आणि स्विस अधिकाऱ्यांनी फिफाविरुद्ध केलेल्या भ्रष्टाचाराच्या कारवाईनंतर प्रायोजकांनीही फिफाला ‘रेड कार्ड’ दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात व्हिसा कंपनीने
केली असून त्यांनी फिफामधील भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्याची जोरदार मागणी केली आहे. तसे न केल्यास प्रायोजकत्व काढून घेण्याची मागणी व्हिसाने केली आहे.
व्हिसापाठोपाठ कोका-कोला, अदिदास, मॅक्डॉनल्ड यांनीही प्रायोजकत्व काढून घेण्याची धमकी दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. व्हिसा म्हणाले, ‘‘या प्रकरणाने निराश आणि चिंतीत झालो आहे. या प्रकरणाची सखोल आणि त्वरित चौकशी व्हावी. विश्वचषक स्पध्रेच्या निमित्ताने जगभरातील लोक एकत्र येतात. म्हणूनच आम्ही फिफासोबत जोडलो. छ’
फिफाचे प्रायोजक
अदिदास : जर्मनीतील ही कपंनी १९७० पासून फिफाच्या प्रायोजकत्वाची भूमिका पार पाडत आहे. त्यांनी फिफाशी सध्या केलेला करार २०३० पर्यंत आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार चार वर्षांसाठी त्यांनी १०३ कोटी अमेरिकन डॉलरचा करार केला आहे.
कोका-कोला : शीत पेय उत्पादक कंपनीने फिफाशी १६ वर्षांचा करार केला असून तो २०२२ साली संपुष्टात येणार आहे. चार वर्षांसाठी ८१ कोटी अमेरिकन डॉलरचा हा करार आहे.
व्हिसा : फिफासाठी सर्वाधिक प्रायोजक करणाऱ्या कंपनीमध्ये व्हिसा अग्रक्रमांकावर आहे. २००७ साली त्यांनी फिफाशी करार केला आणि तो २०२२ पर्यंत आहे.
ह्युंदाय : दक्षिण कोरियाची वाहन उत्पादक कंपनी २०१८ विश्वचषकात प्रायोजकत्व करणार आहे. २०१० मध्ये ह्य़ुंडायने हा करार २०२२ पर्यंत वाढवला आणि सूत्रांच्या माहितीनुसार  १९७९.२ कोटी अमेरिकन डॉलरचा हा करार आहे.  
गॅजप्रोम : रशियातील गॅस कंपनीने फिफाशी चार वर्षांचा करार केला आहे आणि त्यात २०१८च्या विश्वचषकाचाही समावेश आहे.
विश्वचषकातील प्रायोजक
बडवाइझर : १९८६च्या विश्वचषकापासून बडवाईझर प्रत्येक विश्वचषकात फिफाचे प्रायोजक आहेत.
मॅक्डॉनल्ड : १९९४ पासून ही कपंनी विश्वचषकाला प्रायोजकत्व देत आहे.