फुटबॉलची महासत्ता समजल्या जाणाऱ्या स्पेनने उत्तर कोरियाला २-० असे पराभूत करीत कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची बाद फेरी गाठली. तीन सामन्यांमध्ये त्यांनी दोन सामने जिंकून सहा गुणांची कमाई केली.

बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी स्पेनला हा सामना जिंकणे अनिवार्य होते. त्यादृष्टीनेच त्यांनी सुरुवातीपासून सांघिक कौशल्यपूर्ण खेळावर भर दिला होता. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला मोहम्मद मौखलिसने स्पेनचे खाते उघडले. त्याने अप्रतिम चाल करीत हा गोल केला. मात्र स्पेनला पूर्वार्धात याच गोलवर समाधान मानावे लागले. त्यांच्या अनेक चाली कोरियन खेळाडूंनी रोखून धरल्या. उत्तरार्धातही बराच वेळ त्यांना दुसऱ्या गोलसाठी वाट पाहावी लागली. सामन्याच्या ७१व्या मिनिटाला त्यांना गोल करण्याची हुकमी संधी लाभली. त्याचा फायदा घेत सीझर गिल्बर्टने गोल केला व संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी कायम ठेवीत त्यांनी सामना जिंकला. या सामन्यातील पराभवामुळे कोरियाच्या बाद फेरीच्या आशा धुळीला मिळाल्या.

Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार

ड  गट

स्पेन                          उ.कोरिया

२                                 ०

मोहम्मद मौखलिस      ४’

सीझर गिल्बर्ट             ७१’

इराणकडून कोस्टा रिकाचा धुव्वा

वृत्तसंस्था, मडगाव

गोव्यात झालेल्या लढतीत बलाढय़ इराणने ‘कोस्टा रिकाचा ३-० असा धुव्वा उडवला. इराणने तीन सामन्यांमध्ये सर्वाधिक ९ गुणांसह साखळी फेरीतील ‘क’ गटात आघाडीचे स्थान मिळवले.

सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या इराणने पूर्वार्धात २-० अशी आघाडी मिळवली होती. सामन्याच्या २५व्या मिनिटाला त्यांच्या मोहम्मद घोबीशावीने गोल करीत संघाचे खाते उघडले. त्याने पेनल्टी किक्द्वारा हा गोल केला. पाठोपाठ चार मिनिटांनी पुन्हा इराणला गोल करण्याची हुकमी संधी लाभली. त्याचा लाभ उठवीत ताहा शरियतीने अप्रतिम खेळ करीत दुसरा गोल साकारला.

इराणला पूर्वार्धात बराच वेळ गोल करण्यात यश मिळाले नाही. अखेर ८९व्या मिनिटाला त्यांना गोल करण्याची संधी लाभली. त्याचा फायदा घेत मोहम्मद सरदारीने चेंडू गोलमध्ये तटवला. इराणला त्यानंतर गोल नोंदवता आला नाही.

क  गट                                    

इराण                       कोस्टा रिका

३                               ०

मोहम्मद घोबीशावी २५’

ताहा शरियाती २९’

मोहम्मद सरदारी ८९’

इराणपाठोपाठ जर्मनीही  बाद फेरीत

इराण व जर्मनी यांनी शानदार विजय नोंदवत कुमार विश्वचषक चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल केली. झुंजार गिनी संघाचे आव्हान मात्र साखळीतच संपुष्टात आले. इराणने साखळीतील तिन्ही सामने जिंकत आरामात बाद फेरी गाठली. जर्मनीच्या खेळाडूंनी कोची येथील सामन्यात गिनी संघावर ३-१ अशी मात केली आणि सहा गुणांसह दुसरे स्थान मिळवले.

जर्मनीपुढे गिनीची चिवट झुंज अपयशी

कोची : जागतिक फुटबॉल क्षेत्रात जर्मनीचा दबदबा आहे. मात्र इराणने त्यांना धूळ चारल्यानंतर जर्मनीला अखेरच्या सामन्यात गिनीविरुद्ध विजय मिळवणे अनिवार्य होते. जर्मनीने अपेक्षेप्रमाणेच गिनीचा ३-१ असा पाडाव करीत पुढील फेरी गाठली.

सामन्याच्या आठव्या मिनिटाला जॅन-फिटी अर्पने संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यांचा हा आघाडीचा आनंद गिनीच्या इब्राहीम सौमाहने २६व्या मिनिटाला हिरावून घेतला. त्याने सुरेख गोल करीत बरोबरी साधली व जर्मनीला धक्का दिला. पहिल्या सत्रात गिनीने कडवी लढत देत गिनीला १-१ असे बरोबरीत रोखले.

सामन्याच्या उत्तरार्धात विजय मिळवण्याच्या ईर्षेनेच जर्मनीने खेळ केला. ६२व्या मिनिटाला त्यांच्या निकोलस कुनने गोल केला व संघाला आघाडी मिळवून दिली. जर्मनीला २-१ याच आघाडीवर समाधान मानावे लागणार असे वाटत असतानाच भरपाई वेळेतील दुसऱ्या मिनिटाला त्यांना पेनल्टी किक मिळाली. त्याचा फायदा घेत साहवेर्दी सेटिनने जर्मनीला ३-१ असे अधिक्य मिळवून दिले.

क गट

जर्मनी                                  गिनी

३                                             १

जॅन-फिटी अर्प ८’                 इब्राहिम सौमा २६’

निकोलस कुन ६२’

साहवेर्दी सेटिन ९०’+२

ब्राझीलचा नायजरवर सहज विजय

मडगाव : विश्वविजेतेपदाचे प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या ब्राझीलने कुमार (१७ वर्षांखालील) विश्वचषक स्पर्धेच्या ‘ड’ गटात नवख्या नायजरवर २-० असा सहज विजय मिळवला. आतापर्यंत तीन वेळा विश्वजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या ब्राझीलच्या लिंकोनने सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला पहिला गोल करत संघाचे खाते उघडून दिले. त्यानंतर ३४व्या मिनिटाला ब्रेनेरने अजून एक गोल करत ब्राझीलने आघाडी दुप्पट केली. मध्यंतरापर्यंत त्यांनी २-० अशी आघाडी कायम ठेवली होती. दुसऱ्या सत्रात मात्र ब्राझीलला एकही गोल करता आला नाही, त्यामुळे नाजयरसारख्या नवख्या संघावर त्यांना मोठय़ा फरकाने विजय मिळवता आला नाही. ‘ड’ गटामध्ये ब्राझील नऊ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. स्पेनने सहा गुणांसह गटामध्ये दुसरे स्थान मिळवले आहे.

ड  गट

ब्राझील                      नायजर

२                                  ०

लिंकोन  ४’

ब्रेनेर    ३४’

 

ब्राझील, स्पेन उपउपांत्यपूर्व फेरीत

संभाव्य विश्वविजेते म्हणून गणल्या जाणाऱ्या ब्राझील आणि स्पेनने ड-गटातून उपउपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले आहे. या गटात तिसऱ्या स्थानावर असलेल्या नायजरलाही बाद फेरीत स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. अखेरच्या साखळी लढतीत ब्राझीलने नायजरचा  आणि स्पेनने उत्तर कोरियाचा आरामात पराभव केला.