खेळाचा संपूर्ण वेळ संपलेला. दोन्ही बाजूने एकही गोल नोंदवला गेला नाही. आता सामन्याचा निकाल पेनल्टी शुटाऊट वर येवून ठेपला. अर्जेंटीनाच्या गोल रक्षकाने त्याची जागा घेतली. नेदरलँडचा गोली चेंडूवर. चेंडूला जोरदार कीक. आणि अर्जेटीनाचा गोल रक्षक सर्जिओ रोमेरोने गोल आडवला. अर्जेटीनाच्या पाठीराख्यांमध्ये एकच जल्लोष. अशा प्रकारे अर्जेटीनाच्या सर्जिओ रोमेरोने २ गोल वाचवले. अर्जेंटीनाने हा सामना ४-२ शुटाऊटने जिंकत फिफा विश्वकपाच्या अंतिम सामन्यामध्ये धडक मारली.
सामना सुरू असताना अनेकवेळी पारडे या संघाकडून त्या संघाकडे झुलत होते.  दोन आणि तीन मिनिटांचा बोनस टाइम देवूनही गोल न झाल्याने अर्ध्या तासाच्या अतिरिक्त वेळ देण्यात आला. मात्र, गोल न झाल्याने पेनल्टी शुटआऊटचा निर्णय घेण्यात आला. पेनल्टी शुटआऊटमध्ये अर्जेंटिनाने नेदरलँडसचा ४-२ ने पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली.