दहाव्या आंतराष्ट्रीय मुंबई मॅरेथॉनला आज(रविवार) जल्लोषात सुरूवात झाली. थंडीचा गारठा असुनही हजारो मुंबईकर मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. दरम्यान मुंबई मॅरेथॉनमधील अर्धमॅरेथॉनचे निकाल हाती लागले यात, पुरूषांच्या गटात नितेंद्र सिंगने १ तास सहा मिनिटे आणि सोळा सेकंदात अर्धमॅरेथॉनचे अंतर पार करुन पहिले स्थान पटकावले आहे. तर, सचिन पाटील दुस-या व आतवा भगत तिस-या स्थानी आहेत. महिला गटात आंतरराष्ट्रीय धावपटू सुधा सिंगने पहिले स्थान मिळविले. तर, रितू पाल दुस-या आणि मोनिका आथरे तिस-या स्थानावर राहिली.