‘फाईट ऑफ द सेंच्युरी’ अर्था बॉक्सिंगच्या महामुकाबल्यात अमेरिकेच्या फ्लॉईड मेवेदरनं बाजी मारली. मेवेदरने फिलिपिन्सच्या मॅनी पॅकियाओचा  पराभव केला.
अमेरिकेच्या लास वेगासमध्ये एमजीएम ग्रँड गार्डन अरेनात फिलिपाईन्सच्या मॅनी पॅकियाओ आणि अमेरिकेच्या फ्लॉइड मेवेदर या दोन वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर्समध्ये हा सामना झाला.  मेयवेदरला ११४२ कोटी रुपये व पखियाओला ७६१ कोटी रुपये मिळाले. तसेच विजेत्याला ६.३४ कोटी रुपयांचा हिरेजडित बेल्ट मिळाला.  मेवेदर जगातील सर्वाधिक कमाई करणारा बॉक्सर आहे. त्याची संपत्ती जवळपास २७ अब्ज रुपये आहे. तर त्याच्याशी भिडणारा पॅक्वेची कमाई २२ अब्ज इतकी आहे. आजवरच्या कारकीर्दीत ४८ लढतींमध्ये मेवेदर अजिंक्य राहिला आहे.