महाराष्ट्राकडून अनेक रणजी सामन्यांमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून नावलौकिक मिळविलेल्या सुनील गुदगे यांचे मंगळवारी येथे हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई, पत्नी व मुलगी असा परिवार आहे.
गुदगे यांनी १९७९ ते १९९६ या कालावधीत ५५ रणजी सामन्यांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. लेगस्पीन व गुगली गोलंदाजीबाबत त्यांची ख्याती होती, पण त्याचबरोबर उपयुक्त फलंदाज म्हणूनही त्यांनी ठसा उमटविला होता. त्यांनी रणजीमध्ये एक शतक व चार अर्धशतकेही झळकावली होती, १२५ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती. अचूक मारा करताना त्यांनी ११० विकेट्स घेतल्या होत्या. एकाच डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी त्यांनी पाच वेळा केली होती. त्यांनी १९ वर्षांखालील व २२ वर्षांखालील भारतीय संघाचेही प्रतिनिधित्व केले. पश्चिम विभाग व अध्यक्षीय संघांकडून परदेशी संघांविरुद्धही सामने खेळले. तसेच त्यांनी देवधर करंडक व दुलीप चषक स्पर्धेतही अष्टपैलू कामगिरी केली होती.
राष्ट्रीय निवड समितीचे माजी सदस्य सुरेंद्र भावे, मिलिंद गुंजाळ, अभिजीत देशपांडे, अनंत धामणे, विश्वास गोरे, सुभाष रांजणे, संतोष जेधे, श्रीकांत जाधव, अनिल वाल्हेकर, संजय कोंढाळकर, कैसर फकी आदी खेळाडूंनी गुदगे यांचे अंत्यदर्शन घेतले.

Amar Singh Chamkila Son jaiman
“त्यांच्या पहिल्या पत्नीपासून…”, सावत्र आईच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे अमरसिंग चमकीला यांचा मुलगा, म्हणाला…
alliance with the BJP the opposition of the farmers Dushyant Chautala
भाजपाशी युती तुटली तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम, दुष्यंत चौटाला यांच्या अडचणी थांबता थांबेना
mentally retarded girl rape marathi news
धक्कादायक! मतिमंद मुलीवर अत्याचार, तरुणाविरुद्ध गुन्हा
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?