अपोलो जिमतर्फे आयोजित केलेल्या दिलीपशेठ पाटील स्मृतिचषक ६३व्या राष्ट्रीय हौशी शरीरसौष्ठव स्पध्रेत महाराष्ट्राचा गिरीश शेट्टी ‘भारत-श्री’ किताबाचा मानकरी ठरला. ठाण्यातील खारीगाव विभागातील मफतलाल मिनी स्टेडियमवर झालेल्या या स्पध्रेत महाराष्ट्राचाच वरचष्मा राहिला. महाराष्ट्राचा संजयआंबेरकर ‘भारत-श्रीमान’ किताबाचा मानकरी ठरला, तर प्रसाद लोखंडेने ‘पश्चिम भारत-श्री’किताबावर नाव कोरले.
‘भारत-श्री’ किताबाच्या स्पध्रेत महाराष्ट्राच्या गिरीश शेट्टीसमोर इतर राज्यातल्या शरीरसौष्ठवपटूंपेक्षा त्याचे सहकारी सतीश मालुसरे आणि प्रसाद लोखंडेचे कडवे आव्हान होते. कर्नाटकचा आर. रवीचंद्रन आणि जी. बालकृष्णन या स्पध्रेत अनुक्रमे ‘भारत-किशोर’ आणि ‘भारत-कुमार’ किताबाचे विजेते ठरले.
.
स्पध्रेचा  निकाल
‘भारत-श्री’ – शॉर्ट ग्रुप :
सतीश मालुसरे, संजय मुदुली, रोशन फेरेरो.
मीडियम ग्रुप : हेमंत कुमार, नरेंद्र राठोड, संतोष पाटील.
टॉल ग्रुप – गिरीश शेट्टी,
विशाल सावंत, हरिहर साहू.
सुपर टॉल ग्रुप : प्रसाद लोखंडे, राकेश मुलाम, नटराजू आर.
‘भारत-किशोर’ –
शॉर्ट ग्रुप : सय्यद परवेझ,
अक्षय भोईर, विनोद हेलवाडकर. मीडियम ग्रुप : आर. रवीचंद्रन, हर्षल कराळे, नीलेश दवणे.
टॉल ग्रुप : रुचित म्हात्रे, के. सी. संतोष, एन. एस. चक्रधर.
सुपर टॉल : एन. मंजुनाथ, प्रवीण चौधरी, राहुल पाटकर