आधारकार्डसाठीची प्रक्रिया किती सहजसोपी आहे हे लोकांपर्यंत पोहोचविताना जाहिरातीसाठी धोनीचे हे छायाचित्र नक्कीच उपयुक्त ठरेल. पण आधारकार्डसाठी धोनीने प्रशासनाकडे सुपूर्द केलेला वैयक्तिक माहितीचा अर्जच सोशल मीडियावर व्हायरल करून त्याची वैयक्तिक माहिती सार्वजनिक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खुद्द धोनीची पत्नी साक्षी हिने ही बाब सरकारच्या लक्षात आणून दिली. धोनी आपल्या आधारकार्डसाठी फिंगरप्रिंट्स देत असतानाचे छायाचित्र सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेसच्या ट्विटर हॅण्डलवर ट्विट करण्यात आले. पण धोनीच्या छायाचित्रासोबत त्याने फॉर्मवर पुरवलेल्या माहितीचा स्क्रिनशॉट देखील सीएससीकडून ट्विट करण्यात आला. या संपूर्ण प्रकारावर धोनीच्या पत्नीने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून थेट केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांना याबाबत जाब विचारला.
”आधारकार्डसाठीच्या अर्जावर नमूद करण्यात आलेली सर्व वैयक्तिक माहिती सार्वजनिक करण्यात आली. वैयक्तिक आयुष्य आता शिल्लक राहिले आहे का?” असा खोचक सवाल साक्षीने रविशंकर प्रसाद यांना विचारला.