भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्या झटपट धावा करण्यात पटाईत आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई करुन त्यानं अनेकदा स्वत:ला सिद्ध केलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झटपट धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पांड्या सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकत्यामध्ये पुन्हा पांड्याचा धमाका दिसला तर तो क्रिकेटच्या मैदानातील सर्वाधिक झटपट धावा करणारा खेळाडू ठरु शकेल. सध्याच्या घडीला वेस्ट इंडिजचा आंन्द्रे रसेलने १३०.८५ च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. त्यानं वेस्ट इंडिजकडून ४१ सामन्यांतील ४३ डावांत २९.२७ च्या सरासरीनं ९८५ धावा केल्या आहेत. यात त्यानं ५३ षटकार खेचले आहेत.

पांड्याने कोलकात्ता वन-डेत धमाकेदार खेळी केली. तर स्ट्राईक रेटच्या जोरावर तो अव्वल स्थानी झेप घेऊ शकतो. मैदानात दमदार खेळीच्या जोरावर झटपट धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ग्लेन मॅक्सवेल तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानं वनडेत १२५.१४ च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या आहेत. पांड्यानं २२ सामन्यांत १२९.९ च्या स्टाईक रेटनं ३९१ धावा केल्या आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय मैदानावर सर्वात जलद ५० षटकार खेचण्याचा विक्रम देखील त्याला खुणावत आहेत. पांड्यानं १३ डावात आतापर्यंत २१ षटकार खेचले आहेत. न्यूझीलंडच्या कोरी अँडरसनने ३३ सामन्यांत षटकारांचे अर्धशतक साजरं केलं. हार्दिक पांड्यामध्ये हा विक्रम मोडीत काढण्याची क्षमता आहे. पांड्यानं २०१६ मध्ये ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडच्याविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी केली आहे.