भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या चांगलाच प्रकाश झोतात आहे. क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय आपल्या स्टाईल स्टेटमेंटनं चर्चेत असणाऱ्या पांड्यानं श्रीलंका दौऱ्यात वडिलांवरचे प्रेम दाखवून दिलं होतं. त्यानं आपल्या वडिलांना कार भेट दिली होती. यशाच्या शिखरावर असल्यामुळेचं तो वडिलांना महागडी कार सहज भेट देऊ शकला. कदाचित याच सर्व श्रेय क्रिकेटच्या मैदानात त्यानं गाळलेला घाम हेच आहे.

त्याच्या फार कमी चाहत्यांना माहिती असेल की, पांड्याच्या कुटुंबियांना एकवेळचं अन्न मिळवण्यासाठी संघर्ष करायला लागायचा. पण या परिस्थितीतही पांड्याच्या वडिलांनी त्यांच्या दोन्ही मुलांनी म्हणजेच क्रिकेटमध्ये करिअर करावे, असं स्वप्न पाहिले.  हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते किरण मोरे यांच्या अकादमीमध्ये आपल्या दोन मुलांना घेऊन गेले होते. यावेळी कुणाल सात वर्षांचा तर हार्दिक अवघ्या ५ वर्षांचा होता. मोरे यांच्या अकादमीमध्ये वयाच्या १२ वर्षांपेक्षा कमी मुलांना प्रवेश दिला जात नसल्यामुळे त्यांनी सुरुवातीला पांड्या बंधूना प्रवेश देण्यास नकार दिला. यावेळी पांड्याच्या वडिलांनी दोन्ही मुलांचा एकदा खेळ पाहा, अशी विनंती केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मोरेंनी जेव्हा दोघांचा खेळ पाहिला तेव्हा मोरे चांगलेच प्रभावित झाले.

Akash Chopra Says Hardik Pandya’s yet but his absence is definitely hurting GT this season
IPL 2024 : “त्याच्या उपस्थितीचा मुंबईला फायदा झाला नसेल, पण…”, हार्दिक पंड्याबाबत माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य
Hardik Pandya Rohit Sharma
हार्दिकचे कर्णधारपद धोक्यात? क्रिकेटवर्तुळात चर्चा; माजी क्रिकेटपटूंमध्ये मतमतांतरे

त्यानंतर दोघांना त्यांच्या अकादमीत प्रवेश तर मिळालाच पण पांड्या बंधूंच्या खेळातील कौशल्य पाहिल्यानंतर मोरेंनी आपल्या अकादमीतील १२ वर्षांच्या आतील मुलांना प्रवेश देण्याची अटही शिथिल केली. खुद्द किरण मोरे यांनी एका मुलाखतीमध्ये पांड्यासंदर्भातील हा किस्सा सांगितला होता. पांड्या बंधूंना किरण मोरे ‘मॅगी ब्रदर्स’ अशी हाक मारत. याला देखील खास कारण होते. मैदानात मेहनत घेतल्यानंतर पौष्टिक आहार घेणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे दोन्ही भाऊ मॅगी खाऊन आपली भूक भागवायचे, अशी आठवणही मोरे यांनी यावेळी सांगितली. विशेष म्हणजे मोरे यांनी ३ वर्षे या दोघांकडून कोणतीही फी आकारली नव्हती.