आयसीसी महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारतीय महिलांनी २८१ धावांची मजल मारली. या खेळीत भारताची हिरो ठरली ती मधल्या फळीतली फलंदाज हरमनप्रीत कौर. केवळ ११५ चेंडुत १७१ धावा करत हरमनप्रीतने भारतीय डावाला आकार दिला. हरमनप्रीतच्या या खेळीत २० चौकार आणि ७ षटकार होते. हरमनप्रीतच्या या खेळीला कर्णधार मिताली राज, दिप्ती शर्मा आणि वेदा कृष्णमुर्तीने चांगली साथ दिली.

या वादळी खेळीनंतर जगभरातील सेलिब्रेटी आणि भारतीय खेळाडूंनी हरमनप्रीतवर शुभेच्छांचा पाऊस पाडला. त्यामुळे महत्वाच्या सामन्यात हरमनप्रीतने केलेल्या खेळाचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येतंय.

हरमनप्रीतचं कौतुक करताना काही महत्वाच्या खेळाडूंनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हणलंय, हे एकदा पाहूयात –