सुरुवातीला घेतलेली आघाडी वाया दवडल्यामुळे भारतीय संघाला ३६व्या चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत ऑलिम्पिक विजेत्या जर्मनीविरुद्ध ३-३ बरोबरीत समाधान मानावे लागले. भारतीय खेळाडूंनी सामन्यात बहुतांशी वेळ चेंडूवर नियंत्रण राखले.
व्ही. आर. रघुनाथने सहाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले. २४व्या मिनिटाला टॉम ग्रामबचने गोल केला. २६व्या मिनिटाला मनदीप सिंगने गोल करत प्रत्युत्तर दिले. ३२व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. चारच मिनिटांत टॉम ग्रामबचने खणखणीत गोल केला. ५७व्या मिनिटाला जर्मनीतर्फे जोनास गोमोलने पेनल्टीचे रुपांतर गोलमध्ये केले. दुसऱ्या सत्रात भारताच्या ढिसाळ बचावाचा फायदा उठवत जोनासने निर्धारित वेळ संपायला ३ मिनिटे असताना गोल करत जर्मनीला बरोबरी करुन दिली. डॅनिश मुजताबा आणि मनप्रीत सिंग यांनी दीडेशव्या आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले.