हॉकी इंडिया लीग स्पध्रेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीच्या यमानपदाचा मान गतविजेत्या रांची रेज संघाला मिळाला आहे. उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामना अनुक्रमे २० ते २१ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे. हॉकी इंडियाच्या मान्यतेने घेण्यात येणाऱ्या या लीगला १८ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे.
जेपी पंजाब वॉरियर्स, दिल्ली वेव्हरायडर्स, कलिंगा लँसर्स, उत्तर प्रदेश विझार्ड, दबंग मुंबई आणि रांची अशा सहा संघांचा या लीगमध्ये समावेश आहे. लीगचा पहिला सामना कलिंगा लँसर्स आणि उत्तर प्रदेश विझार्ड यांच्यात होणार आहे. कलिंगा संघाने जर्मनीच्या मोरित्ज फुएस्र्टेला सर्वाधिक रक्कम देऊन आपल्या चमूत दाखल करून घेतले आहे. गतविजेता रांची संघ लीगमध्ये गतउपविजेत्या जेपी पंजाब वॉरियर्सविरुद्ध आपल्या जेतेपद राखण्याच्या अभियानाला सुरुवात करणार आहे. १६ जानेवारीला दबंग मुंबई पहिल्या लढतीत कलिंगा लँसर्स संघाचा मुकाबला करेल.