‘आयपीएल’च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणावर मौन बाळगणाऱया कॅप्टनकुल धोनीने आज(मंगळवार) पहिल्यांदा जाहीर वक्तव्य केले असून आयपीएलच्या स्वच्छतेसाठी लाँड्रीचा वापर केला पाहीजे असे विनोदातून म्हटले.
आयपीएलची प्रतिमा स्वच्छ राखण्यासाठी काय करायला हवे? असे धोनीला विचारण्यात आले होते. यावेळी उत्तर देताना धोनी म्हणाला की, “आयपीएलची प्रतिमा स्वच्छ राखण्यासाठी लाँड्रीचा वापर करायला हवा. चांगल्या धोब्यासाठी आम्ही प्रयत्न करू, धोबी आम्हाला स्वच्छ ठेवेल.” असे विनोद वृत्तीने उत्तर दिले.
धोनी पदत्याग करण्याची शक्यता.
आयपीएलच्या सातव्या मोसमातील सामन्यांसाठी धोनी सोमवारी दुबईमध्ये दाखल झाला. स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे धोनीही वादाच्या भोवऱयात आहे तसेच चेन्नई सुपर किंग्ज संघही वादात अडकला होता. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार स्पॉटफिक्सिंगच्या निपक्ष:पाती चौकशीसाठी ‘इंडिया सिमेंट’ कंपनीशी निगडीत कोणाही व्यक्तीचा बीसीसीआयमध्ये समावेश नसावा असे सांगितले होते. याच ‘इंडिया सिमेंट’ कंपनीचा धोनी उपाध्यक्ष आहे.
महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपरकिंग्जच्या कर्णधारपदाला अलविदा?