राशिद खान हे सध्याच्या घडीला आंतराष्ट्रीय क्रिकेटमधलं एक महत्वाचं नाव. १९ वर्षीय राशिद खानने गेल्या काही सामन्यांमध्ये अफगाणिस्तानकडून खेळताना आपली छाप पाडली आहे. याच कामगिरीच्या जोरावर राशिदची सर्वात आधी आयपीएल आणि त्यानंतर बिगबॅश लिग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी आयसीसीने अफगाणिस्तानला कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा दिला. यानंतर आगामी वर्षांसाठी राशिदने आपली महत्वाकांक्षा बोलून दाखवली. “मला अफगाणिस्तानात क्रिकेट विश्वचषक जिंकून आणायचा आहे. सध्यातरी माझ्या आयुष्याचं हेच एक ध्येय असल्याचं,” राशिद खान म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक क्रिकेटच्या पटलावर अफगाणिस्तानचा संघ जरी नवीन असला तरी त्यांच्यात अनेक मोठ्या संघाना हरवण्याची ताकद आहे. पुढील १० वर्षांमध्ये हा संघ आयसीसी क्रमवारीत पहिल्या सहा जणांमध्ये येऊ शकतो. अफगाणिस्तानचे माजी प्रशिक्षक अॅडम होलीओक यांनीही संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं. “अफगाणिस्तानातील मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटचं वेड आहे. राशिद खानमुळे अनेक स्थानिक खेळाडू क्रिकेटकडे वळले आहेत. अनेकदा दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोट यारख्या गोष्टींची पर्वा न करता लोकं राशिदचा सामना पहायला येतात. अफगाणिस्तानमध्ये होणारा हा बदल नक्कीच स्वागतार्ह असल्याचं,” होलीओक यांनी म्हणलंय.

आयपीएलनंतर राशिद खानची बीगबॅश लीगच्या अॅडीलेड स्टाईकर्स या संघात निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज जेसन गिलेस्पीच्या हाताखाली राशिद सराव करणार आहे. त्यामुळे बीगबॅश लीग स्पर्धेत राशिद कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I want to win world cup for afghanistan says rashid khan
First published on: 04-10-2017 at 13:44 IST