ट्वेन्टी-२० विश्वविजेत्या वेस्ट इंडिज संघाचा धिक्कार करणारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर महान क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांनी तोफ डागली आहे. आयसीसीचा डॅरेन सॅमीच्या नेतृत्वाखालील विंडीज संघासाठी एक नियम, तर भारतीय संघासाठी दुसरा नियम आहे, अशा शब्दांत रिचर्ड्स यांनी टीका केली आहे.

जगज्जेतेपद काबीज केल्यानंतर सॅमी, ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, मार्लन सॅम्युअल्स यांनी वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाच्या कारभारावर नाराजी प्रकट केली होती. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचे वागणे अयोग्य, असभ्य असे होते व त्यामुळेच कार्यक्रमाची प्रतिमा डागाळली, असे  दुबईतील आयसीसीच्या बैठकीनंतर मत मांडण्यात आले होते.