पाकिस्तानचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार मिसबाह-उल-हकने आपल्या सहकारी खेळाडूंना पारंपारिक प्रतिस्पर्धी भारतीय संघापासून टी-२० विश्वचषकात सावध आणि तितक्याच तयारीनिशी राहण्यास सांगितले आहे. याचे कारण आहे महेंद्रसिंग धोनीचे भारतीय संघातील पुनरागमन.
होय, पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह-उल-हकच्या मते भारतीय क्रिकेट संघाची खरी ताकद महेंद्रसिंग धोनी आहे. मिसबाह म्हणाला की, धोनी टीम इंडियाची खरी ताकद आहे आणि त्याचे संघातील पुनरागमन म्हणजे पाकिस्तानला विजयासाठी आणखी कठीण सराव करण्याची गरज आहे.
टी-२० विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना उद्या मिरपूर येथे रंगणार आहे. आशिया चषकात पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी, पाकिस्तान भारतीय संघाला कधीच स्वस्तात घेणार नाही असेही मिसबाह म्हणाला.