माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि ब्रिटिश पत्रकार पीअर्स मॉर्गन यांच्यातील सोशल मीडियावरील वाद साऱ्या जगाला माहीत आहे. कोणत्या ना कोणत्या कारणावरून हे दोघेही एकमेकांना भिडतात. आता निमित्त झालं ते महिला क्रिकेट विश्वचषकातील भारत विरूद्ध इंग्लंड सामन्याचे. मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजीने विरोधी संघाला घाम फोडणाऱ्या सेहवागने इथंही आपला तोच रूबाब कायम ठेवला आहे. टीम इंडियाचा इंग्लंडकडून निसटता पराभव झाल्यानंतर मॉर्गनने सेहवागला डिवचण्याचा प्रयत्न केला. पण सेहवाग हा काही कच्च्या गुरूचा चेला नाही. त्यानेही मॉर्गनच्या ट्विटला चोख प्रत्युत्तर दिले.

विश्वचषकातील अंतिम सामन्यात इंग्लंडच्या महिलासंघाकडून भारताचा थोडक्यात पराभव झाल्यानंतर मॉर्गनने लगेचच सेहवागला डिवचले. त्याने थेट काहीही भाष्य न करता एक ट्विट करत, सेहवाग तू बरा आहेस ना, असा बोचरा सवाल केला.