ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या मुख्य रणसंग्रामाला भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याने मंगळवारी रात्री सुरूवात होणार आहे. मायदेशात विश्वचषक स्पर्धेचे आयोजन आणि दमदार फॉर्मात असल्यामुळे भारतीय संघ स्पर्धेतील प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या ११ ट्वेन्टी-२० सामन्यांपैकी १० सामने भारताने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघ संपूर्ण आत्मविश्वासाने स्पर्धेचा श्रीगणेशा करण्यासाठी सज्ज असणार आहे. न्यूझीलंडच्या संघाने सराव सामन्यात गतविजेत्या श्रीलंका संघासमोर २२६ धावांचा डोंगर रचून आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले आहे. तरीसुद्धा भारतीय संघात सध्या उत्तम समतोल असल्यामुळे आजच्या सामन्यात भारताचेच पारडे जड असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. एकंदर दोन्ही संघाची बलस्थाने, कच्चेदुवे आणि महत्त्वाच्या खेळाडूंवर व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाशझोत…