ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सराव सामन्यात पाकिस्तानच्या संघाने गतविजेत्या श्रीलंका संघावर १५ धावांनी मात केली. कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्या पाकिस्तानने श्रीलंकेसमोर विजयासाठी १५८ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात श्रीलंकेला वीस षटकांत ९ बाद १४२ धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानकडून इमाद वसीमने भेदक गोलंदाजी करत श्रीलंकेच्या चार फलंदाजांना माघारी धाडले, तर मोहम्मद इरफानने दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद आमीरने आपल्या चार षटकांत २० धावा दिल्या. श्रीलंकेकडून चंडीमल(३०) आणि लाहेरू थिरिमाने(४५) यांना वगळता इतर कोणताही फलंदाज मैदानात टीकू शकला नाही. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेत दमदार सुरूवा केली. पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिजने ४९ चेंडूत नाबाद ७० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.