‘‘ऑस्ट्रेलियाकडून मानहानीकारक पराभव टाळायचा असेल, तर भारतीय गोलंदाजांनी चुकांमधून धडा घेत उर्वरित लढतीत चांगली कामगिरी करायला हवी,’’ असा सल्ला भारताचे संघ संचालक रवी शास्त्री यांनी दिला. पाच सामन्यांच्या मालिकेत गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताला ०-३ अशा पिछाडीसह मालिकाही गमवावी लागली.
‘‘गोलंदाजांनी चुकांमधून धडा घेतला, तर ऑस्ट्रेलियाला ते रोखू शकतात. त्यांनी घोर निराशा केली आहे, यात दुमत नाही. एका किंवा दोन गोलंदाजांच्या जोरावर सामना जिंकू शकत नाही. एकसंध होऊन गोलंदाजी करण्याची आवश्यकता आहे.
गतवर्षी विश्वचषक स्पध्रेत चांगली कामगिरी करण्यामागचे हेच कारण आहे. संघातील पाचही प्रमुख गोलंदाजांनी टिच्चून मारा
केला होता,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.