न्यूझीलंडविरुद्धच्या भारतीय ‘अ’ आणि अध्यक्षीय संघ जाहीर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी भारतीय ‘अ’ संघाबरोबर अध्यक्षीय संघाची निवड केली असून मुंबईच्या श्रेयस अय्यरकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. न्यूझीलंड ‘अ’विरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यांसाठीच्या संघाचे कर्णधारपद श्रेयसकडे असेल, त्याचबरोबर न्यूझीलंड संघाचे ब्रेबॉर्न स्टेडियमवर अध्यक्षीय संघाविरुद्ध दोन सराव सामने खेळवण्यात येणार असून या संघाचे नेतृत्वही श्रेयसकडे सोपवण्यात आले आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ‘अ’ संघांमध्ये पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. पण पाच सामन्यांसाठी दोन स्वतंत्र संघांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या तीन सामन्यांमध्ये श्रेयसकडे संघाचे नेतृत्व असेल तर अखेरच्या दोन सामन्यांसाठी रिषभ पंत संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे.

भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी न्यूझीलंडचा संघ मुंबईमध्ये दोन सराव सामने खेळणार आहे. त्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना २२ ऑक्टोबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

संघ पुढीलप्रमाणे –

  • भारतीय ‘अ’ संघ (पहिल्या तीन सामन्यांसाठी) : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मयांक अगरवाल, दीपक हुडा, शुभम गिल, श्रीवत्स गोस्वामी, शाहबाझ नदीम, कर्ण शर्मा, विजय शंकर, शार्दूल ठाकूर, सिद्धार्थ कौल, मोहम्मद सिराज, बासिल थम्पी.
  • भारतीय ‘अ’ संघ (अखेरच्या दोन सामन्यांसाठी) : रिषभ पंत (कर्णधार), ए आर ईश्वरन, प्रशांत चोप्रा, अंकित बावणे, शुभम गिल, बाबा अपराजित, शाहबाझ नदीम, कर्ण शर्मा, विजय शंकर, शार्दूल ठाकूर, सिद्धार्थ कौल, मोहम्मद सिराज, बासिल थम्पी.
  • अध्यक्षीय संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, शिवम चौधरी, करुण नायर, गुरकीरत मान, दीपक चहर, धवल कुलकर्णी, जयदेव उनाडकट आणि अवेश खान.