विदेशी लीगमध्ये खेळणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू

भारताची हरमनप्रीत कौर ऑस्ट्रेलियातील बिग बॅश ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत खेळणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरणार आहे. बिग बॅश स्पर्धेतील सिडनी थंडर्स संघाने हरमनप्रीतला आपल्या ताफ्यात समावेश केला आहे. गतविजेता थंडर्सचा संघ दुसऱ्या हंगामात जेतेपद कायम राखण्यासाठी उत्सुक आहे.

Indian Premier League Cricket Mumbai vs Chennai ipl 2024 match sport news
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: मुंबई-चेन्नई आमनेसामने! पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत आज वानखेडेवर होणाऱ्या द्वंद्वात धोनीवर लक्ष
Dipendra Singh Airee Sixes Video
Dipendra Singh Airee : ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत नेपाळच्या फलंदाजाने कतारच्या गोलंदाजाला फोडला घाम, पाहा VIDEO
pv sindhu
सिंधूची उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेतून माघार; थॉमस चषकासाठी भारताचा मजबूत संघ
rohan bopanna and matthew ebden win miami open men s doubles title
मियामी खुली टेनिस स्पर्धा : बोपण्णा-एब्डेन जोडीला विजेतेपद

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काही दिवसांपूर्वी महिला क्रिकेटपटूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याला परवानगी दिली. या निर्णयानुसार विदेशी लीगमध्ये खेळणारी हरमनप्रीत पहिली महिला खेळाडू ठरणार आहे. बिग बॅश स्पर्धेतील तीन संघांनी हरनप्रीतला संघात समाविष्ट करण्यासंदर्भात स्वारस्य दाखवले होते. अखेर सिडनी थंडर्स संघाने बाजी मारली. नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी-२०विश्वचषकात हरमनप्रीतने ८९ धावा करतानाच ७ विकेट्स मिळवत अष्टपैलुत्व सिद्ध केले होते. ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाला नमवण्यात हरमनप्रीतने निर्णायक भूमिका बजावली होती. या मालिकेतील सलामीच्या लढतीत हरमनप्रीतने ३१ चेंडूत ४६ धावांची खेळी केली होती.

गेल्यावर्षी अ‍ॅडलेड स्ट्रायकर्स संघाने मिताली राज आणि झूलन गोस्वामी यांना संघात समाविष्ट करुन घेण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र देशांतर्गत महिला क्रिकेट स्पर्धेत राष्ट्रीय खेळाडूंनी खेळावे असा बीसीसीआयचा आग्रह असल्याने त्यांना बिग बॅश स्पर्धेत खेळण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही.