पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी सर्वच संघांची तयारी अंतिम टप्प्यात येऊन ठेपली असताना महान क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी गतविजेता भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांना विश्वविजेतेपदाची संधी असल्याचे म्हटले आहे. ‘‘आगामी विश्वविजेता भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यापैकी एक असेल. वेस्ट इंडिजचा संघ ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची शक्यता आहे,’’ असे चॅपेलने सांगितले.