वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीसाठी कोहली कर्णधार, तर रहाणे उप-कर्णधार

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली, सलमीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शिखर धवन यांना झिम्बाब्वे दौऱयावरील छोटेखानी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेसाठी संघाचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीकडे असणार असून संघात फैज फजल हा नवा चेहरा पाहायला मिळणार आहे. फैजसोबतच केल.एल.राहुल, मनिष पांडे, करुण नायर, चहल, जयदेव उनाडकट या युवांना संधी देण्यात आली आहे.

दुसरीकडे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विराट कोहलीकडे कर्णधार पदाची धुरा असणार असून मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे उप-कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कसोटी संघात अनुभवी खेळाडूंसोबतच शार्दुल ठाकूर या युवा खेळाडूचाही १६ जणांच्या संभाव्य यादीत समावेश करण्यात आला.
भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामन्यांचा समावेश असून मालिका ११ जूनपासून सुरू होणार आहे.

झिम्बाब्वे दौऱयासाठीचा भारतीय संघ-
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), के.एल.राहुल, फैज फजल, मनिष पांडे, करुण नायर, अंबाती रायुडू, ऋषी धवन, अक्षर पटेल, जयंत यादव, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, बरिंदर सरन, मनदीप सिंग, केदार जाधव, जयदेव उनाडकट, यजुवेंद्र चहल

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीचा संघ-
विराट कोहली(कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, के.एल.राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे(उप-कर्णधार), रोहित शर्मा, वृद्धीमान साहा, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुनेश्वर कुमार, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, स्टुअर्ट बिन्नी