ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकात विश्वविजेतेपद कायम राखण्यास भारतीय संघ सज्ज असून यंदाच्या स्पर्धेसाठी भारत हा प्रबळ दावेदार असल्याचे मत भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलिया दूतावासाच्या एका कार्यक्रमात व्यक्त केले. या कार्यक्रमात सचिनने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबोट यांची भेट घेतली, त्याचबरोबर डॉन ब्रॅडमन यांच्या आठवणींना उजाळाही दिला.
‘‘पुढील वर्षांत ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. १९९२-९३ साली झालेल्या विश्वचषकाच्या काही आठवणी अजूनही मनात रुंजी घालत आहे. पण या वेळी सर्वाना आठवण करून देऊ इच्छितो की, विश्वविजेतेपद कायम राखण्यास भारतीय संघ सज्ज आहे,’’ असे सचिन म्हणाला.
सर डॉन ब्रॅडमन यांच्या आठवणींना उजाळा देताना सचिन म्हणाला की, ‘‘ब्रॅडमन यांनी माझी निवड सर्वकालीन कसोटी संघामध्ये केली होती, माझ्यासाठी ही सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यामुळेच या संघाबरोबरचे छायाचित्र मी जपून ठेवले असून माझ्यासाठी तो एक खजिनाच आहे. त्यांनी आपल्या पत्नीला एकदा बोलावून सांगितले होते की, हा मुलगा माझ्यासारखीच फलंदाजी करतो. हे ऐकल्यावर मला अत्यानंद झाला, माझ्या आयुष्यातील तो सर्वोच्च क्षण होता. सिडनीमध्ये खेळताना एकदा त्यांची बॅट मला हाताळायला मिळाली आणि मी धन्य झालो.’’
खेळाविषयी सचिन म्हणाला की, ‘‘तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, खेळभावनेनेच मैदानात उतरायला हवे आणि प्रतिस्पध्र्याचा आदर करायला हवा. खेळ तुम्हाला आयुष्यात बरेच काही शिकवतो. छ’