पहिल्यांदाच खेळला गेलेला अंधासाठीचा टि-ट्वेन्टी विश्वचषक भारताने आज (गुरूवार) जिंकला. विशेष म्हणजे भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २९ धावांनी नमवून पहिल्यावहिल्या अंध विश्वचषकावर नाव नोदंवण्याची कामगिरी भारतीय संघाने केली आहे. आज बंगळुरूच्या सेंट्रल कॉलेज मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये या स्पर्धेचा अंतिम सामना झाला, त्यामध्ये भारतीय संघाने ही कामगिरी केली आहे.
प्रथम फलंदाजी करून भारताने २० षटकांमध्ये पाकिस्तानसमोर विजयासाठी २५९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ २० षटकांमध्ये ८ बळींच्या बदल्यात २२९ धावांमध्येच गडगडला. त्यामुळे भारताने हा सामना तबब्ल ३० धावांनी आपल्या खिशात घातला. भारतीय संघातील केतन बेदी याने सर्वाधिक ९८, प्रकाश जयरामैया ४२ आणि उपकर्णधार अजयकुमार रेड्डीने २५ धावा केल्या.