दक्षिण आफ्रिकेचा संघ येत्या सप्टेंबर महिन्यात भारत दौऱयावर येत असून तीन ट्वेन्टी-२०, पाच एकदिवसीय आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. तब्बल ७२ दिवसांचा हा भरगच्च दौरा असणार आहे. एवढ्या प्रदीर्घ दौऱ्यावर प्रथमच द. आफ्रिकेचा संघ भारतात येत आहे. २९ सप्टेंबरपासून या दौऱयाला सुरूवात होईल. दिल्लीत २९ सप्टेंबरला द.आफ्रिका सराव सामना खेळेल. त्यानंतर धर्मशाला येथील ट्वेन्टी-२० सामन्याने या दौऱयाला सुरूवात होईल.

वेळापत्रक-
टी-२० सामने-
* २ ऑक्टोबर: पहिला ट्वेन्टी-२० सामना, धर्मशाला
* ५ ऑक्टोबर: दुसरा ट्वेन्टी-२० सामना, कटक
* ८ ऑक्टोबर: तिसरा ट्वेन्टी-२० सामना, कोलकाता

एकदिवसीय सामने-
* ११ ऑक्टोबर: पहिला सामना, कानपूर
* १४ ऑक्टोबर: दुसरा सामना, इंदूर
* १८ ऑक्टोबर: तिसरी सामना, राजकोट
* २२ ऑक्टोबर: चौथा सामना, चेन्नई
* २५ ऑक्टोबर: पाचवा सामना, मुंबई</p>

कसोटी सामने-
* पहिली कसोटी: ५ ते ९ नोव्हेंबर, मुंबई
* दुसरी कसोटी: १४ ते १८ नोव्हेंबर, बंगळुरू
* तिसरी कसोटी: २५ ते २९ नोव्हेंबर, नागपूर<br />* चौथी कसोटी: ३ ते ७ डिसेंबर, दिल्ली