श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या ५ वन-डे आणि १ टी-२० सामन्यासाठी बीसीसीआयने आज भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारताचं आगामी काळातलं व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता काही महत्वाच्या खेळाडूंना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या भारत ‘अ’ संघातील काही खेळाडूंना वन-डे संघात जागा देण्यात आली आहे.

बीसीसीआयने रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजाला वन-डे मालिकेत विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरीक्त युवराज सिंह, मोहम्मद शमी, उमेश यादव, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत यांनाही संघात स्थान देण्यात आलेलं नाहीये.

मुंबईकर रोहीत शर्माकडे संघाचं उप-कर्णधारपद सोपवण्यात आलेलं आहे. तर लघरच्या शार्दुल ठाकूरला मात्र गेल्या काही हंगामात केलेल्या चांगल्या कामगिरीचा फायदा होताना दिसतोय. कारण श्रीलंकेविरुद्ध वन-डे संघात त्याची निवड झालेली आहे.

कसा असेल श्रीलंकेविरुद्ध भारताचा वन-डे संघ? –

विराट कोहली ( कर्णधार ), शिखर धवन, रोहीत शर्मा ( उप-कर्णधार ), लोकेश राहुल, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी ( यष्टीरक्षक ), हार्दीक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर

अवश्य वाचा – जाणून घ्या हार्दीक पांड्याच्या शतकानंतरच्या सेलिब्रेशनमागचं रहस्य