वानखेडे स्टेडियमवर आज सकाळपासून सुरू झालेल्या भारत आणि इंग्लंडदरम्यान दुस-या कसोटी सामन्यात पहिल्याच सत्रात इंग्लंडने भारताचे तीन गडी बाद करत सामन्यावर चांगलीच पकड घेतली आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताने 28 षटकांत ३ बाद 83 धावा केल्या आहेत.गौतम गंभीर 4 धावांवर जेम्स अंडरसनच्या गोलंदाजीवर पायचित झाला.वीरेंद्र सहवागने 43 चेंडूत 30 धावा काढून बाद झाला, तर सचिनही 12 बॉलमध्ये 8 धावा करून माघारी परतला. चेतेश्वर पुजारा 38 तर, विराट कोहली 6 धावांवर खेळत आहेत.आपला शंभरावा कसोटी सामना खेळणाया सेहवागने आज चौकाराने सुरुवात केली. मात्र, तो 30 धावा काढूनच बाद झाला. अहमदाबाद येथे झालेला इंग्लंडविरूध्दचा पहिला कसोटी सामना भारताने जिंकला होता.