भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीच्या दमदार शतकामुळे भारताने वेस्ट इंडिजसमोर ३३० धावांचे आव्हान उभे केले आहे. विराटने ११४ चेंडूत १२७ धावा करत त्याच्या कारकिर्दीतील २०वे शतक झळकावले. तत्पूर्वी अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीने भारताला चांगली सुरूवात करून दिली. हे दोघे बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि सुरेश रैना यांच्या वेगवान फलंदाजीमुळे भारताला ३०० धावांचा टप्पा ओलांडता आला. भारत आणि वेस्ट इंडिज यांनी  दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रत्येकी एक विजय मिळवला असून या सामन्यातील विजय दोन्ही संघांसाठी अतिश्य महत्वपूर्ण आहे. त्यामुळे आता मार्लन सॅम्युअल्स, दिनेश रामदिन आणि ड्वेन स्मिथ यांच्या जोरावर विंडीजचा संघ भारताचे आव्हान पेलण्यात यशस्वी होईल का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.