भारतीय मल्लांनी आणखी चार सुवर्णपदके जिंकून ससेरी शहर (इटली) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्यांनी फ्रीस्टाईल विभागात आठ सुवर्णपदकांसह एकूण नऊ पदकांची कमाई केली.
सोनू (६१ किलो), सोमवीर
(८६ किलो), मौसम खत्री (९७ किलो) व हितेंदर (१२५ किलो) यांनी सोनेरी कामगिरी केली. याआधी या स्पर्धेत अमितकुमार (५७ किलो), योगेश्वर दत्त (६५ किलो), प्रवीण राणा (७० किलो) व नरसिंग यादव (७४ किलो) यांनी भारतास सुवर्णयश मिळवून दिले होते. रजनीशकुमार याला मात्र ६५ किलो गटांत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.