प्रशासक नसतो तर मीसुद्धा अर्ज केला असता, असे मत भारताचा माजी संघनायक सौरव गांगुलीने व्यक्त केले आहे. प्रत्येकाला अर्ज करण्याचा अधिकार आहे. आम्ही उपलब्ध अर्जापैकी सर्वोत्तम व्यक्तीची भारताच्या प्रशिक्षकपदासाठी निवड करू, असे मत गांगुलीने शास्त्री यांनी प्रशिक्षकपदासाठी केलेल्या अर्जाबाबत व्यक्त केले.

प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील मतभेद अधिक परिपक्वपणे हाताळण्याची गरज होती, असे मत गांगुलीने व्यक्त केले. भारताचा मुख्य प्रशिक्षक नेमणाऱ्या क्रिकेट सल्लागार समितीमध्ये समाविष्ट असलेल्या गांगुलीने म्हटले की, ‘‘कुंबळे आणि कोहली यांच्यातील वाद अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता आला असता. दुर्दैवाने तो योग्यरीत्या हाताळला गेला नाही.’’