जपानविरुद्ध होणाऱ्या आगामी हॉकी कसोटी मालिकेसाठी भारताच्या संभाव्य २५ खेळाडूंची निवड करण्यात आली. ही मालिका ३ ते ९ मे दरम्यान भुवनेश्वर येथे आयोजित केली जाणार आहे.
जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरीसाठी ही मालिका पूर्वतयारी म्हणून आयोजित करण्यात आली आहे. हॉकी लीग जूनमध्ये होणार आहे. भारतीय संघाचे सराव शिबीर येथील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर २२ ते ३० एप्रिलदरम्यान होणार आहे.
भारतीय संघ
गोलरक्षक : पी.आर.श्रीजेश, हरज्योतसिंग. बचावरक्षक : गुरबाजसिंग, रुपींदरपालसिंग, बीरेंद्र लाक्रा, कोठाजितसिंग, व्ही.आर.रघुनाथ, जसजितसिंग, गुरमेलसिंग, गुरजिंदरसिंग, हरमानप्रितसिंग. मध्यरक्षक : मनप्रीतसिंग, धरमवीरसिंग, सरदारासिंग, एस.के.उथप्पा, चिंगलेनासानासिंग कंगुजाम, परदीप मोर. आघाडी फळी : एस.व्ही.सुनील, रमणदीपसिंग, आकाशदीपसिंग, मनदीपसिंग, निक्कीन थिमय्या, सतबीरसिंग, दानिश मुजताबा, ललित उपाध्याय.