ग्लागो (स्कॉटलंड) येथे पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या संभाव्य हॉकी संघाच्या सराव शिबीराला येथे बुधवारपासून प्रारंभ होत आहे. मेजर ध्यानचंद आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हे शिबिर होणार आहे.
संभाव्य संघात ३३ खेळाडूंचा समावेश आहे. १२ जुलै रोजी भारतीय संघ येथून रवाना होणार आहे. भारतास पहिल्या लढतीत २५ जुलै रोजी वेल्स संघाशी खेळावे लागणार आहे. त्यानंतर स्कॉटलंड (२६ जुलै), ऑस्ट्रेलिया (२९ जुलै) व दक्षिण आफ्रिका (३१ जुलै) यांच्याशी भारताचे सामने होणार आहेत.   
भारताचा संभाव्य संघ
गोलरक्षक- पी.आर.श्रीजेश, हरज्योतसिंग, सुशांत तिर्की. बचावरक्षक- गुरबाजसिंग, बीरेंद्र लाक्रा, रुपींदरपालसिंग, व्ही.आर.रघुनाथ, गुरमेलसिंग, गुरजिंदरसिंग, विक्रम कांत, गुरिंदरसिंग, मनप्रीतसिंग, दिवाकर राम, कोठाजितसिंग. मध्यरक्षक- धरमवीरसिंग, सरदारासिंग, एस.के.उथप्पा, जसजितसिंग, दानिश मुजताबा, चिंगलेनासाना सिंग, सतबीरसिंग, देविंदर वाल्मीकी, विकास पिल्ले. आघाडी फळी- एस.व्ही.सुनील, रमणदीपसिंग, निक्किन थिमय्या, ललित उपाध्याय, युवराज वाल्मीकी, तलविंदरसिंग, अफान युसुफ, नितिन थिमय्या.